#
JANSEVAK
Sahakari Patpedhi Maryadit, Mumbai
REGISTRATION NO:/ BOM/WD/RSR/CR/1034/YEAR1980

आमच्या विषयी

जनसेवक सहकारी पतपेढी मर्यादित मुंबई या संथेची नोंदणी सन १९८० ह्या साली करण्यात आली असली तरी संस्थेचा कार्यकाल अवघा साडे चार वर्षांचा आहे. कारण सन २००६ मध्ये शासनाने नवीन पतसंस्था नोंदणी बंद केल्याने संचालक मंडळाच्या विनंती वरून सहकार खात्याने अवसानायात गेलेल्या पतसंस्थांपैकी ही संस्था पुनर्जीवित करून संचालक मंडळाच्या स्वाधीन केली. संचालक मंडळाने दिनांक : १/११/२००६ रोजी संस्थेचा कारभार रितसरपणे सुरु केला.


आपल्या संस्थेच्या नोंदणी पासूनचा ३५ व्हा वर्षाचा व संचालक मंडळाच्या कारकीर्दीमधील ९ व्या वर्षाचा ३१ मार्च २०१५ अखेर संपलेल्या सहकारी वर्ष्यातील आम्ही केलेल्या वार्षिक कार्याचा आढावा असलेला अहवाल तसेच आर्थिक व त्याच अनुषंगाने झालेल्या व्यवहारा संबंधीच्या बाबींचा विस्तृत तपशील असलेला आर्थिक तालेबंध , नफा - तोटा पत्रक यामध्ये दिलेला आहे.

संस्थेची ठळक वैशिष्ट्ये

१. प्रथम क्रमांक सर्वोत्कृष्ठ नागरी सहकारी पतसंस्था (सन २०१२ -२०१३)
२. गेली ९ वर्षे ऑडीट वर्ग ' अ ' व 'अ स्टार ' .
३. संस्थेची सर्व कार्यालये स्वमालकीची संगणीकृत व वातानुकुलीत.
४. ठेवीवर सर्वाधित व्याज देणारी संस्था
५. रुपये १०,००० भागधारण करणाऱ्या सभासदास दरवर्षी लाभांश व आकर्षक भेट वस्तू.
६. बाहेरील कोणतेही कर्ज नसणारी स्वावलंबी संस्था.
७. सामाजिक बांधिलकीतून सभासदांच्या मुलांना मोफत वह्या वाटप करणारी एकमेव संस्था.
८.अनुउत्पादक कर्जाची १००% तरतूद करणारी सक्षम संस्था .
९. आपलुकीने विनम्र व तत्पर सेवा देणारा कर्मचारी वर्ग.
१०. ठेव स्वीकारणे व ठेव परत करण्यासाठी ठेव प्रतिनिधी मार्फत घरपोच सेवा.
११. सभासदांचा विश्वास संपादन करून अल्पावधीतच यशाचे शिखर गाठणारी यशस्वी संस्था